इयत्ता ५ वी विषय परिसर अभ्यास २ इतिहास म्हणजे काय स्वाध्याय.

 १.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ) भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला  (इतिहास ) म्हणतात.
 
आ) इतिहास केवळ (कल्पने)च्या आधारे लिहिला जात नाही.

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ ) शास्त्रीय पद्धत म्हणजे काय ?
उत्तर : प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे महणतात.

आ ) स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे ?
उत्तर : स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्यलढा या कृतीचा परिणाम आहे.

 इ ) इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते ?
उत्तर : इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते.

३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते ?
उत्तर : पुरावा शोधण्यासाठी , तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे शास्त्र असे म्हटले जाते.

आ) गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात ?
उत्तर : गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात.

४. संकल्पनाचित्र तयार करा.

इतिहास  कोणाचा 
 उत्तर : गावाचा
          राज्याचा
          मंदिराचा 
         किल्ल्याचा
            माझा
            शाळेचा
            देशाचा 
            जगाचा 

५. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा.
इतिहासाची साधने - नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्र ग्रंथ, लेणी, लोककथा.




  मुलांनो हा स्वाध्याय आवडला असेल, तर मित्रांसोबत शेअर करा.


Channel youtube. https://youtube.com/@EducationParth5th
 




Comments

Popular posts from this blog

इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास एक आपले भावनिक जग.